बीड शहराजवळील मांजरसुंबा घाट परिसरात कंटेनर आणि डिझेल टँकरचा अपघात झाला होता. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नव्हती.या प्रकरणाशी कोणताही संबंध नसताना, अब्बास खान या युवकाकडून ग्रामीण पोलीस स्टेशन, बीड येथे कार्यरत असलेल्या पोलीस कॉन्स्टेबल आतिश याने पैशांची मागणी केल्याचा गंभीर आरोप, बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे, मंगळवार दि.16 डिसेंबर रोजी रात्री करण्यात आला आहे. युवकाला पोलिस ठाण्यात तासन्तास बसवून ठेवून धमकी देत फोन-पे द्वारे दहा हजार रुपये उकळल्याचा दावा देखील के