राहाता: बिबट्याच्या हल्ल्यात एका गायीचा मृत्यू.. तिसगाव येथील घटना...
राहता तालुक्यातील तीसगाव येथे बिबटयाने धुमाकुळ घातलाय. काल झालेल्या हल्ल्यात एका गायीचा मृत्यु झाला असून परिसरात भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. शेतकरी गणेश रांधवणे यांच्या शेतातील गोठ्याजवळ दोन गायी बांधल्या होत्या. त्याचवेळी बिबटया दबा धरून आला व एका गायीवर झडप घालून तिला गंभीर जखमी केलं, काही वेळातचं गायीचा मृत्यु झाला. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी आले व परिस्थितीचा आढावा घेतला. या घटनेनंतर नागरिकांमधे संतापाचं वातावरण पाहायला मिळत आहे.