दापोली: दापोली पणदेरी बौद्धवाडी येथे तरुणाची गळफास घेत आत्महत्या
दापोली तालुक्यातील पणदेरी बौद्धवाडी येथे मानसिक आजाराने त्रस्त असलेल्या ३९ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना १७ सप्टेंबर रोजी दुपारी दीड ते अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.