शेतातील बांधावरून पाणी भरण्यासाठी दांड काढल्याच्या कारणावरून झालेल्या वादात एका शेतकऱ्यास लाकडी दांड्याने बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना आठेगाव शिवारात घडली.या प्रकरणी कन्नड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.संजय धोंडोपंत कुलकर्णी (५५, रा. आठेगाव) हे शेतात असताना संशयित आरोपी नारायण विठ्ठल पवार (रा. चापानेर) याने दांड काढल्याच्या कारणावरून त्यांच्याशी वाद घालत शिवीगाळ केली.वाद वाढल्यानंतर आरोपीने कुलकर्णी यांना लाकडी दांड्याने मारहाण केली.