जालना: महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक -धरणे आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषण करण्यावर निर्बंध
आज दिनाक 21 डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता मिळालेल्या माहितीनुसारराज्य निवडणूक आयोगाने महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक -2025 साठी निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आलेली आहे. जालना शहर महानगरपालिका क्षेत्रामध्ये सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये/संस्था, शासकीय विश्रामगृह, सार्वजनिक ठिकाणे, रस्त्याच्या ठिकाणी धरणे आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषण करण्यावर निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निर्बंध घालण्यात आले आहेत