मोहाडी तालुक्यातील वरठी पुलावर दि. 18 जानेवारी रोजी रविवारला रात्री 10 वाजताच्या सुमारास ट्रक पलटला यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. सदर अपघात हा रस्त्याच्या कारणावरून झाला असून रस्त्यावरील पडलेल्या जीवघेणे खड्ड्यांमुळे वाहन चालकाच्या वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. यावेळी नागरिकांनी वाहन चालकाला वाहनातून बाहेर काढले मात्र, वारंवार होणाऱ्या या रस्त्यावरील अपघाताला जिम्मेदार कोण? असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.