तुमसर येथे आयोजित तालुका क्रीडा स्पर्धेत जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा भडंगा येथील विद्यार्थ्यांनी कबड्डी मुले यात प्रथम क्रमांक पटकाविले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार डॉ. प्रशांत पडोळे सहअध्यक्ष माजी आमदार दिलीप बन्सोड, अर्थ बांधकाम सभापती जिल्हा परिषद गोंदियाचे डॉ. लक्ष्मण भगत, सभापती पंचायत समिती गोरेगावच्या चित्रकला चौधरी, उपसभापती रामेश्वर महारवाडे उपस्थित होते.