कळमनूरी: कळमनुरी येथील केंब्रिज स्कूल ऑफ स्कॉलर शाळेला हरित शाळा पुरस्कार प्रदान
पर्यावरण संवर्धन वृक्ष लागवड आणि हरित अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या उपक्रमाबद्दल पतंजली योग समिती हिंगोली ने कळमनुरी शहरातील केंब्रिज स्कूल ऑफ स्कॉलर्स या शाळेला हरित शाळा पुरस्कार 2025 देऊन सन्मानित केले असल्याची माहिती आज दिनांक 30 नोव्हेंबर रोजी प्राप्त झाली आहे .मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत शाळेच्या संचालिका डॉ . शितल कल्याणकर,शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी हा पुरस्कार स्वीकारला आहे.या शाळेच्या टीमचे सर्वत्र अभिनंदन व्यक्त होत आहे.