कोरेगाव पार्क परिसरातील लेन नंबर ५ येथील ‘हॉटेल कोरा’ येथे विनापरवाना मोठ्या आवाजात साऊंड सिस्टिम वाजवून नागरिकांना त्रास दिल्याप्रकरणी पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ तसेच ध्वनी प्रदूषण (विनियमन व नियंत्रण) नियम २००० मधील नियम ५ चा भंग केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली.