पुसद: श्री गुरू तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहिदी समागम कार्यक्रमाचे आयोजन ; जिल्हाधिकारी विकास मीना
Pusad, Yavatmal | Nov 28, 2025 ‘हिंद दी चादर श्री गुरू तेग बहादूर’ यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त देशभर विविध प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. विदर्भात नागपूर येथे ७ डिसेंबर रोजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार असून, विविध माध्यमांतून या कार्यक्रमाची माहिती जिल्ह्यात सर्वदूर पोहोचवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी विकास मीना यांनी आज येथे दिले.