चाळीसगाव (प्रतिनिधी): महावितरणच्या बाह्य स्रोत (Outsourcing) कामाचा ठेका मिळालेल्या कंपनीने अनुभवी आणि पात्र कामगारांना डावलून, कथितरीत्या बोगस कागदपत्रे असलेल्या नवीन कामगारांची भरती केल्याच्या निषेधार्थ रयत सेनेने 31 डिसेंबर रोजी महावितरण कार्यालयासमोर धडक आंदोलन केले. नेमके प्रकरण काय? मेसर्स नेक्सन मल्टी सर्व्हिसेस कार्पोरेशन (छत्रपती संभाजीनगर) या ठेकेदाराला २०२५-२६ या वर्षासाठी कामगार भरतीचा ठेका मिळाला आहे.