नेर: नेर नगरपरिषद निवडणुकीमध्ये नवरीने लग्नाच्या बोहल्यावरून उतरून बजावला मतदानाचा हक्क
Ner, Yavatmal | Dec 3, 2025 नेर नगरपरिषद साठी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी मतदारांमध्ये मतदानासाठी मोठा उत्साह दिसून आला. त्याचबरोबर एका नवरीने लग्नाच्या बोहल्यावरून उतरून थेट मतदान केंद्र गाठले व आपला मतदानाचा हक्क बजावला. कोमल संगेवार असे लग्नाच्या बोहल्यावरुन उतरून मतदानाचा हक्क बजावणाऱ्या नवरीचे नाव आहे.