भंडारा: खासदार पटेलांची मध्यस्थी निष्फळ! राष्ट्रवादीच्या विद्रोही गटाचा स्वतंत्र लढण्याचा निर्धार; पैशांनी तिकीट वाटप झाली.....
भंडारा जिल्ह्यातील हाय व्होल्टेज तुमसर नगरपरिषद निवडणुकी करिता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या वतीने अभिषेक कारेमोरे यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर झाली. मात्र राष्ट्रवादीचे आमदार राजू कारेमोरे यांचे खंदे समर्थक असलेले यासीन छवारे व सागर गभने यांनी पक्षश्रेष्ठींच्या या निर्णयामुळे नाराज होऊन विद्रोह केला. दरम्यान राष्ट्रवादीचे पक्षश्रेष्ठी खासदार प्रफुल पटेल व आमदार राजू कारेमोरे हे निवडणूक प्रचाराकरिता तुमसर येथे आलेले असताना राष्ट्रवादीच्या विद्रोही गटातील यासीन छवारे