हिवरा मजरा शिवारात कमलाकर डोंगरे यांच्या शेताजवळ बुधवार दिनांक 3 डिसेंबरला दुपारी 3:30 वाजता भरधाव स्कॉर्पिओ ने प्रवासी वाहतूक करणाऱ्या अँपे वाहनाला जबर धडक दिली. यात पाच जण जखमी झाले. तिघांना गंभीर मार लागला तर दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. याप्रकरणी मारेगाव पोलिसात स्कार्पिओ वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे