वैभववाडी: करुळ घाटात पाच ठिकाणी धोकादायक दरडी;तज्ञ टिमकडून सर्व्हेक्षण
करुळ घाटात पाच ठिकाणी दरडीं धोकादायक असून त्या दरडींचा भाग हटविण्याचा निष्कर्ष या टिमकडून काढण्यात आला आहे.त्यानुसार या घाटाच्या दरडी हटवण्याच्या कामास आज पासून सुरुवात करण्यात आल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या कार्यकारी अभियंता वृषाली पाटील यांनी दिली.