जालना: सागर धानुरे यांचा सुपारी देऊन खून; अज्ञात मारेकरी २४ तासांत जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई
Jalna, Jalna | Dec 22, 2025 जालना शहरातील बायपास रोडवरील कलावती हॉस्पीटल समोर सागर धानुरे याने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आली होती. परंतु, पोलीसांनी सुक्ष निरीक्षक करुन सत्य घटना समोर आणली. सोमवार दि. 22 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता मिळालूल्या माहितीनुसार ही आत्महत्या नसून सागर धानुरे यांचा सुपारी देऊन खून केल्याचा प्रकार उघड केला. त्यामुळे सागर धानुरे याची हत्या झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या गंभीर प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या २४ तासांत अज्ञात आरोपींचा शोध घेऊन दोघांना जेरबंद केले आहे.