जिल्हा परिषद शाळा खोपडी बु येथे ८ व ९ डिसेंबर रोजी आयोजित केंद्रस्तरीय क्रीडा महोत्सव उत्साहात पार पडला. केंद्रप्रमुख विजय काळे, क्रीडा अध्यक्ष विष्णू चंदनकार व क्रीडा सचिव राजेंद्र शेंडे यांनी संपूर्ण आयोजन केले. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून शाळा समितीचे अध्यक्ष विष्णू जिरे व उपाध्यक्ष प्रमोद राठोड यांनी उद्घाटन केले. अशी माहिती केंद्रप्रमुख विजय काळे यांनी आज दिनांक दहा डिसेंबरला दुपारी तीन वाजता दरम्यान दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून माध्यमांना दिली आहे