कोपरगाव तालुक्यात बिबट्यांचा वावर अजूनही दिसून येत आहे. रविवारी १५ डिसेंबर रोजी रात्री बिबट्याने शेतमजुरावर हल्ला केल्याची घटना माहेगाव देशमुख शिवारात घडली. याबाबत १६ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वनविभागाने दिली आहे.कुंभारी येथील दामू नामदेव मोरे (वय ४९) हे दिवसभराचे काम आटोपून सायंकाळी दुचाकीवरून कुंभारी येथे जात होते. त्याच वेळी उसाच्या शेतातून बिबट्याने त्यांच्यावर झडप घातली. यात दामू मोरे यांच्या हातावर आणि पायावर जखमा झाल्या आहेत.