विनाक्रमांकाचे ट्रॅक्टर व धान चुराई मशीन घेऊन ब्रह्मपुरीजवळील चौगान येथे गेला होता. दरम्यान, मशीन बिघडल्याने दुरुस्तीसाठी तिथेच सोडून ट्रॅक्टर घेऊन परतीच्या प्रवासाला निघाला. सारंगड वळणावर भरधाव ट्रॅक्टर उलटल्याने डोक्याला गंभीर दुखापत होऊन प्रवीण रामटेके याचा जागेवरच मृत्यू झाला. मृतदेह रात्रभर घटनास्थळावर पडून होता. रात्र होऊनही घरी न आल्याने कुटुंब व गावकऱ्यांनी पहाटे शोधाशोध केली असता ही घटना उघडकीस आली.