समुद्रपूर: गणेशपूर पारधी बेड्यावर गावठी मोहा दारू गाळपाणा विरोधात पोलिसांची कारवाई:५ लाख ८८ हजाराचा मुद्देमाल नष्ट
समुद्रपुर: आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने पोलिसांनी गणेशपूर पारधी बेड्यावर गावठी मोहा दारू गाळपाणा विरोधात धडक कारवाई करीत ५लाख ८८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल नष्ट केला. प्राप्त माहितीनुसार समुद्रपुर पोलिस ठाण्याचे ठाणेदार रविंद रेवतकर यांना गणेशपूर पारधी बेड्यावर मोठ्या प्रमाणात गावठी मोहा दारू गाळपाणा सुरू असल्याची माहिती मिळताच त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यासह या जाऊन धडक कारवाई केली असता याठिकाणी झाडाझुडपात जमीन मोठ्या प्रमाणात गावठी मोहा दारू सडवा आढळून आला.