संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजनेअंतर्गत वाडी, वस्ती, विकासापासून दूर असलेल्या गावांना स्वतंत्र महसुली दर्जा देण्याबाबत शासनाने परिपत्रक काढले. त्यानंतर आर्णी तालुक्यातील शिवर तांडा, रामनगर व पुरषोत्तमनगर या तीन नवीन गावांना महसुली दर्जा मिळाला असल्याची माहिती आर्णी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रमेश खरोडे यांनी दिली. या संदर्भात ग्रामपंचायत स्तरावरून पळशीअंतर्गत शिवर तांडा, शिवर भंडारी अंतर्गत शिवरतांडा, चिकणी कसबा अंतर्गत रामनगर, किन्ही अंतर्गत चांदापूर, बारभाई अंतर्गत पुरुषोत