बाभूळगाव: तहसील कार्यालय येथून तब्बल 50 ते 55 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास,अज्ञात चोरट्याविरुद्ध बाभुळगाव पोलीसात गुन्हा दाखल
फिर्यादी राजेश रघुनाथ बोबडे यांच्या तक्रारीनुसार 17 नोव्हेंबरला कोणीतरी अज्ञात चोरट्याने तहसील कार्यालय बाभूळगाव येथील जप्त केलेले ट्रॅक्टर ट्रॉली वाहन क्रमांक एम एच 29 बी व्ही 2783 या वाहनाचे ट्रॅक्टर मुंडाचे हायड्रोलिक पट्टी पंप व इतर साहित्य असा एकूण 50 ते 55 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी 17 नोव्हेंबरला सायंकाळी अंदाजे सहा वाजताच्या सुमारास बाभुळगाव पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.