आज डाक अदालतीचे आयोजन भारतीय डाक विभागामार्फत मंगळवार, दि. 9 डिसेंबर 2025 रोजी प्रवर अधीक्षक, डाक घर, अमरावती विभाग यांच्या कार्यालयामध्ये डाक अदालतीचे आयोजन सकाळी 11 वाजता करण्यात आले आहे. पोस्टाच्या कामासंबंधी विशेषत: स्पीड पोस्ट, काउंटर सेवा, डाक वस्तू रजिस्टर पार्सल, बचत बँक व मनी ऑर्डर याबाबत तक्रारींचे निराकरण सहा आठवड्याच्या आत झाले नसणे आणि समाधानकारक उत्तर मिळालेली नसणे अशा तक्रारी विचारात घेऊन डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.