वर्धा शहरात नुकताच शरीरसौष्ठवपटूंच्या पिळदार स्नायूंचा आणि ताकदीचा जबरदस्त थरार पाहायला मिळाला. निमित्त होते 'युवा एकता क्रीडा मंडळा'तर्फे आयोजित 'आमदार श्री' शरीरसौष्ठव स्पर्धेचे!या भव्य स्पर्धेत, रिहाण अली याने आपल्या पीळदार शरीराचे प्रदर्शन करत मानाचा 'आमदार श्री' किताब पटकावला. तर अमर ठाकरे याने उपविजेतेपद मिळवले. या सोहळ्याचे सर्वात मोठे आकर्षण ठरले ते म्हणजे बॉलिवूडचा 'हिरो नंबर १' अभिनेता गोविंदा! असे आज सहा जानेवारी रोजी रात्री आठ वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे