गेल्या नऊ महिन्यांपासून बिबट्या व इतर वन्यप्राण्यांच्या वाढत्या वावरामुळे ग्रामीण भागात भीतीचे वातावरण पसरले आहे.१ एप्रिल २०२५ पासून आतापर्यंत हतनूर, चापानेर, टापरगाव, चिखलठाण, औराळा, जेहर, अंधानेर, नागद आदी गावांमध्ये बिबट्याच्या हल्ल्यांच्या घटना घडल्या.या कालावधीत बिबट्याने शेळी, गाय, वासरू यांसह एकूण १११ पशुधनाची शिकार केल्याची नोंद आहे.या हल्ल्यांमुळे पशुधन मालकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.शासनाच्या नियमानुसार बाधित लाभार्थींना ११ लाख २२ हजार ५४५ रुपये इतकी आर्थिक मदत मिळाली.