आज दिनांक 24 जानेवारी 2026 वार शनिवार रोजी दुपारी 3वाजेच्या सुमारास जाफराबाद तालुक्यातील वरुड येथे जाफराबाद ते छत्रपती संभाजी नगर जाणाऱ्या बस मध्ये महिला प्रवासी नामे विमलबाई एकनाथ तोंडे यांची पन्नास हजार रुपयाची पोत ही वरुड येथे बसमध्ये वाहक बीपी गवळी यांना सापडली यावेळी गवळी यांनी माणुसकी दाखवत सदर प्रवासी महिलेची ही होत असल्याची खात्री करून घेत जाफराबाद येथे आगार प्रमुख यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही हरवलेली पोत महिला प्रवाशाला परत करत माणुसकीचे दर्शन घडवले आहे.