हिंगणघाट : तालुक्यातील किनगाव येथील महादेव शंकरराव ठाकरे यांच्या गावठाण येथे बांधलेल्या गोठ्याला अज्ञात इसमाने आग लावली. यात गोठ्यामध्ये ठेवलेले कुटार तसेच इतर साहित्य आदी तीस हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली आहे. या आगीमध्ये तीन बकऱ्यांना आगीची झळ पोहोचली. २२ शेळ्या होत्या. शेळ्या बांधून नसल्याने मोठे नुकसान टळले. याप्रकरणी तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संगीता हेलोंडे हे करीत आहे.