अवैध दारूविक्रीवर पहाटेच पोलिसांचा घाव; घारगाव येथे आरोपी ताब्यात संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे अवैध दारूविक्री करणाऱ्यावर गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने कारवाई करत शशांक निमसे याला ताब्यात घेतले आहे. आज सकाळी ठीक ८ वाजता मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलिसांनी अकलापूर गावच्या शिवारातील ऐलखोपवाडी येथील ‘हॉटेल जय मल्हार’ येथे छापा टाकला. छाप्यात आरोपीकडून देशी व विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला.