तालुक्यातील चिंचोली डांगे येथील वीरपुत्र सुरेंद्र बाबुराव कुभरे वय 39 यांच्यावर आज दुपारी तीन वाजता लष्करी इतमामात अंत्य संस्कार करण्यात आले .आर्वी पोलीस पथक तुकडी आणि जम्मू लष्करी तुकडी यांनी बंदुकीच्या फेरी झाडून मानवंदना दिली. वर्धा खासदार अमर काळे आमदार सुमित वानखडे आमदार दादाराव केचे यांनी पुष्प चक्र अर्पण केले तहसीलदार डीवायएसपी ठाणेदार यांच्यासह शासकीय अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधी आर्वी विभागातील जनसमुदाय मोठ्या प्रमाणात श्रद्धांजली देण्यास उपस्थित होता