आज दि 18 जानेवारी सकाळी 11 वाजता २०२४ च्या सिल्लोड–सोयगाव विधानसभा निवडणुकीदरम्यान मतदारांना धमकी दिल्याचा गंभीर आरोप आमदार अब्दुल सत्तार यांच्यावर करण्यात आला आहे. प्रचाराच्या शेवटच्या सभेत मतदान न करणाऱ्या मतदारांवर “रामबाण उपाय” करण्याचे वक्तव्य केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते गणेश शंकरपेल्ली यांनी केला आहे. या प्रकरणी गणेश शंकरपेल्ली यांनी सी-विजिल ॲप तसेच संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती. मात्र, तक्रारीनंतरही कोणतीही कारवाई न झाल्याने त्यांनी सिल्लोड न्यायालयात