बोरी पोलिस ठाणे हद्दीतील रोहिला पिंपरी येथे दिवाळीच्या दिवशी फटाके वाजवण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये जोरदार हाणामारीमध्ये जखमी मारोती निवृत्ती डुकरे यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता. आज बुधवार 10 डिसेंबर रोजी दुपारी 12 30 वाजेच्या सुमारास रोहिला पिंपरी येथे कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी मयताच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेत, पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकार पीडित कुटुंबाच्या पाठीशी असल्याचे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.