शासनाकडून घरकुल मंजूर होऊनही केवळ प्रशासकीय उदासीनतेमुळे १५ आदिवासी कुटुंबांचे स्वतःच्या घराचे स्वप्न भंगताना दिसत आहे. या विरोधात धरणगाव तालुक्यातील चावलखेडा येथील संतप्त आदिवासी भिल्ल समाज बांधवांनी आज, सोमवार २९ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता धरणगाव पंचायत समितीवर धडक दिली. दुपारी १२ वाजेपासून तब्बल दोन तास गटविकास अधिकाऱ्यांच्या (BDO) दालनात ठिय्या मांडत लाभार्थ्यांनी प्रशासनाचा तीव्र निषेध केला.