दारव्हा: शहरात चोरट्यांचा धुमाकूळ,घरफोडी व वाहनांच्या डिक्कीतून लाखोचा ऐवज लंपास
दारव्हा शहरातील बुलढाणा अर्बन बँकेसमोर रघुनाथ देवराव कोळपे (वय 67, रा. कविता नगर) यांनी आपली एमएच-29 बीके-2540 क्रमांकाची स्कुटी बँकेसमोर उभी करून तिच्या डिक्कीत 1,90,000 रुपयांची रोकड ठेवली होती ती अज्ञात चोरट्याने लंपास केली तर जलाराम नगर येथे घरफोडी करून लाखोचा ऐवज लंपास केला.