कन्नड: चिंचलो लिंबाजी व करंजखेड परिसरात पावसाने शेतीचे मोठे नुकसान
संततधार पावसाने कन्नड तालुक्यातील चिंचलो लिंबाजी, करंजखेड व परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मका, सोयाबीन आणि कापसाची पिके पाण्याखाली गेली असून मक्याच्या कणसांना कोम्ब फुटले आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून मदत द्यावी, अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे.