गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शासनाच्या अन्यायपूर्ण धोरणामुळे प्रकल्पग्रस्तांनी आक्रमक पवित्रा घेत १२ डिसेंबर रोजी वैनगंगा नदीवर सुरू केलेले जलसमाधी आंदोलन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या दालनात १३ डिसेंबर रोजी होणाऱ्या सभेच्या आश्वासनानंतर तात्पुरते मागे घेण्यात आले होते. मात्र, सदर सभेतून कोणताही मार्ग न निघाल्याने संतप्त झालेल्या प्रकल्पग्रस्तांनी १३ डिसेंबर रोजी रात्री आठ वाजता भंडारा जवळच्या कारधा येथे वैनगंगा नदीत बसून...