गेवराई: ढोक वडगाव फाट्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला, गेवराई तालुक्यात हळहळ
Georai, Beed | Nov 20, 2025 अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला आहे. गेवराई तालुक्यातील ढोकवडगाव फाट्यावर भीषण अपघात झाला असून एक जण जागीच ठार झाला आहे.नॅशनल हायवे क्रमांक 52 वर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने हा अपघात झाला. अक्षय भागवत नरोडे वय 27 वर्ष राहणार देवपिंपरी तालुका गेवराई जिल्हा बीड असे मयताचे नाव आहे. अक्षय हा बीड करून गेवराई कडे दुचाकी वर येत होता. याच दरम्यान अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला जोराची धडक दिली यामध्ये त्याचा दुर्दैवाने मृत्यू झाला सदर घटनेने परिसरात मोठी हळद व्यक्त केली जात आहे