महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची अवैध वाहतूक करणारा कंटेनर अपर पोलीस अधीक्षक कार्यालय व अंबड पोलिसांच्या संयुक्त पथकाने पकडून सुमारे 73 लाख 30 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शनिवार दि.20 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 2 वाजता पोलीस सुत्रांनी या संदर्भातील माहिती दिली. पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल आणि अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी अवैध धंद्यांविरोधात कठोर कारवाईचे आदेश दिले होते.त्या अनुषंगाने 19 डिसेंबर 2025 रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास माहिती मिळाली होती.