नांदुरा: अवैध गौण खनिजासह जप्त केलेला टिप्पर घेऊन चालक पसार;चालकावर गुन्हा दाखल
अवैध गौण खनिज मातीचा जप्त केलेला टिप्पर चालकाने घेऊन पसार झाल्याची घटना २१ नोव्हेंबर रोजी सायंकाळी घडली.शासकीय कामात अडथळा आणला, म्हणून टिप्पर क्रमांक एमएच १९ सीएक्स २५८४ च्या मालक व चालकाविरुद्ध तहसीलदारांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली असून अप नंबर 602/2025 कलम 303(2), 221 भा न्या सं सह कलम 48 महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अशी माहिती आज २२ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता पोलिस सूत्रांनी दिली.