समुद्रपूर: गिरड पोलीस ठाण्यात हद्दीतील एका गावातील प्रेमसंबंधातून अल्पवयीन मुलगी गर्भवती: पोलिसात पोक्सो अन्वय गुन्हा नोंद
गिरड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील एक अल्पवयीन मुलीचे आतेभावा सोबत प्रेम संबंधातून गर्भवती असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.प्राप्त माहितीनुसार अल्पवयीन मुलीची प्रकृती बिघडल्याने तीला शनिवारी हिंगणघाट येथिल खाजगी रुग्णालयात दाखल केले असता ती गर्भवती असल्याची बाब डॉक्टरांच्या निदर्शनास आली यावेळी डॉक्टरांनी यासंबंधी पोलिसांना माहिती दिली .यासंबंधी गिरड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.