महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त क्रांती नाना मळेगावकर प्रस्तुत न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमांमध्ये औसा शहर व तालुक्यातील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन आपल्या कलागुणाचे दर्शन घडविले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी आरोग्य मंत्री तानाजी सावंत, युवा नेते धनंजय सावंत, शिवसेनेचे लातूर जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने, सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली पाटील उपस्थित होते.