अपहरण करून खंडणी मागणाऱ्या फरार आरोपीस पाचोड पोलिसांनी केले जेरबंद वर्षभरापूर्वी तीन लाख रुपयांची खंडणी उकळण्यासाठी विहामांडवा (ता. पैठण) - येथील चौघांनी फरशी बसविण्याऱ्या ठेकेदाराचे अपहरण करून रिव्हॉल्वरची एक गोळी झाडून ५३ हजार ७०० रुपये उकळले. त्यानंतर जिवे मारण्याची धमकी दिली होती. यातील एका फरार आरोपीस पाचोड पोलिसांनी शुक्रवारी अटक केली तब्बल एक वर्षानंतर चिकलठाणा (छ. संभाजीनगर) येथे मोठ्या शिताफीने जेरबंद केले. सचदेव मुराप पवार (वय ३२ रा. रामगव्हाण ता. अंबड, जि. जालना) असे आर