मक्रणपूर येथील बांधकाम व्यावसायिक सईद रशिद अली (३०) हे बेपत्ता आहेत. या संदर्भात कन्नड शहर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. शहर पोलिस ठाण्यात मजास अली खाजा अली (रा. गारका बंगला, कन्नड) यांनी तक्रार दिली. त्यानुसार, सईद रशीद अली हे कामावर जातो म्हणून मक्रणपूर येथील राहत्या घरातून सोमवारी सकाळी दहा वाजता घराच्या बाहेर पडले, ते अद्याप घरी परतलेच नाहीत. त्यांचा मोबाईल बंद आहे. सहायक पोलिस निरीक्षक कुणाल सूर्यवंशी, जमादार गुड्डू बेग तपास करत आहेत