संग्रामपूर: बावनबीर येथे पोषण आहार वाटपात निष्काळजी करणारे मुख्याध्यापक निलंबित
शासनाचे आदेश निर्देश सारं काही वेशीवर टांगून शालेय पोषण आहार वाटपात निष्काळजीपणा दुर्लक्ष केल्याप्रकरणी बावनबीर येथील जिल्हा परिषदेच्या मराठी उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नरहरी विश्वनाथ टिकार यांना जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (प्राथ) यांच्या पत्रानूसार पंचायत समितीचे गटविकास अधिकारी माधव पायघन यांनी निलंबित केल्याची माहिती २२ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता प्राप्त झाली आहे.