भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी रामटेक शहरातील विविध संघटना, सामाजिक, सांस्कृतिक संस्था, राजकीय पक्ष पदाधिकारी, आंबेडकर अनुयाई, बौद्ध बांधवांनी डॉ. बाबासाहेब यांना अभिवादन करून श्रद्धांजली अर्पण केली. शनि. दि. 6 डिसेंबरला सकाळी 9 वाजता पासूनच रामटेक शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील बाबासाहेबांचा पुतळा परिसर, धम्म ज्योती बुद्ध विहार, रमाबाई बुद्ध विहार, कल्याणमित्र बौद्धविहार शितलवाडी, मंजुश्री बुद्ध विहार मनसर, नागार्जुन महाविहार येथे नमन केले.