हिंगणघाट: वणी छोटी गिमाटेक्स इंडस्ट्रीज मध्ये कार्यरत भीमराव पाटील यांच्या कुलूपबंद घरी अज्ञात चोरांनी चोरी केली चोरट्यांनी कपाट तोडून कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने गोफ, मगळसूत्र, चेन्न, कानाचे टॉप्स व अन्य सामान ३७ ग्रॅम वजनाचे दागिने लांबविले. रविवारी ४ जानेवारी रोजी घरमालक भीमराव पाटील शिर्डी येथून परत आल्यावर त्याना ही बाब निदर्शनास आली. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली पोलीस निरीक्षक अनिल राऊत, प्रवीण बावणे, नरेंद्र आरेकर यानी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.