विदर्भ पटवारी संघ नागपूर जिल्हा शाखा / उपविभाग यवतमाळच्या वतीने दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजी आर्णी तहसील कार्यालय परिसरात अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या न्याय्य मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी एक दिवसीय धरणे आंदोलन केले. या आंदोलनात ग्राम महसूल अधिकारी संवर्गाची एकत्रित सेवा जेष्ठता त्वरित लागू करून प्रसिद्ध करावी, ग्राम महसूल अधिकारी संवर्गाला मंडळ अधिकारी संवर्गात तात्काळ पदोन्नती द्यावी, ग्राम महसूल अधिकारी संवर्गाला लॅपटॉप, स्कॅनरसह प्रिंटर त्वरित उपलब्ध करून देण्यात यावे,