माणुसकी हरवली? माऊली घाटात १५ जिवंत वासरांची निर्दयपणे विल्हेवाट; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे निष्पाप जीवांचा बळी 🐄❄️ संगमनेर | प्रतिनिधी संगमनेर तालुक्यातील नाशिक–पुणे महामार्गावरील माऊली येथील जुन्या घाट परिसरात अज्ञात दूध उत्पादक शेतकऱ्यांनी तब्बल १५ जिवंत वासरे निर्दयपणे टाकून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यातील अनेक वासरे अत्यंत लहान असून ती स्वतः चारा खाण्याच्या स्थितीतही नव्हती. या गंभीर घटनेची माहिती पोलीस प्रशासनासह संबंधित ग्रामपंचायतीच्या सरपंचांना देण्यात आली,