भंडारा: पत्नी-बाळाच्या मृत्यूस न्यायासाठी पिता बसले आमरण उपोषणाला
ग्रामीण रुग्णालय लाखांदूर येथे कर्तव्यावर असलेल्या डॉक्टर आणि नर्स यांच्या कथित निष्काळजीपणामुळे आपल्या पत्नीचा आणि नवजात बाळाचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप विवेक नंदू शहारे रा. आसोला, ता. लाखांदूर, जि. भंडारा यांनी केला आहे. या प्रकरणी न्याय मिळावा म्हणून त्यांनी संबंधित विभागांना दिलेल्या तक्रारींना योग्य प्रतिसाद न मिळाल्याने ते २५ नोव्हेंबर रोजी मंगळवारपासून आमरण उपोषण सुरू केले आहे.