रामटेक तालुक्याअंतर्गत पवनी वनपरिक्षेत्रात असलेल्या मोगरकसा संरक्षित वनक्षेत्रात एका दुर्मिळ काळ्या बिबट्याने पर्यटकांचे चांगलेच लक्ष वेधले आहे. बुधवार दि.3 डिसेंबरला सकाळी 9 वा च्या दरम्यान या वनक्षेत्रात या काळ्या बिबट्याने पुन्हा दर्शन दिल्याने पर्यटकांसह वनाधिकारी ही सुखावले आहेत. यामुळे या सफारीकडे पर्यटकांचा ओढा वाढत आहे.