भिवंडी: पोलिसांसमोर भाजप आणि काँग्रेसचे भिडले, लाठा-काठ्या,दगड,खुर्च्या आणि मिळेल त्या वस्तूंनी मारहाण, व्हिडिओ व्हायरल
भिवंडी महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात दरम्यान रात्री उशिरा दोन गटांमध्ये तुफान राडा झाला आहे. प्रभाग क्रमांक 20 मध्ये नारपोली येथील भंडारी चौकामध्ये भाजप आणि काँग्रेस उमेदवारांचे कार्यकर्ते रॅली दरम्यान आमने-सामने आले घोषणाबाजी करत असताना त्यांच्यात वाद झाला. वादाने हिंसक रूप घेतले. त्यानंतर दोन्ही गटातील कार्यकर्ते एकमेकांना लाठ्या-काठ्या, दगड, खुर्च्या अन मिळेल त्या वस्तूने एकमेकांना मारहाण करत शिवीगाळ करू लागले. यावेळी पोलिसांनी सौम्य लाटी चार्ज करत परिस्थिती नियंत्रणात आणली.